इन्फिनिटी रायटर्स क्लब

माणूस हा आपले विचार मांडण्यासाठी भाषेचा माध्यम म्हणून वापर करत असतो. ही भाषा तो मौखीक किंवा लिखीत स्वरूपात मांडत असतो. त्यातून काही माणसांचे लिखाण सहज समजेल असे, मनाला भिडणारे, हृदयस्पर्शी, आणि विचार प्रवर्तक असते. अशा प्रभावी लिहिणाऱ्या माणसांना लेखक असे बिरूदावल आपल्या मानव संस्कृतीत दिले आहे.

अशा लेखन करणाऱ्या माणसांची, लेखनाची आवड असणाऱ्यांची, लेखनात करिअर करू इच्छिणाऱ्या होतकरू तरूण-तरूणींचे एक व्यासपीठ हवे असे आम्हाला वाटते. इन्फिनिटी मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रा. लि. ही अशा अनेक कल्पक संकल्पनांना कायम प्रोत्साहन देत आली आहे. आणि म्हणूनच या लेखनाच्या क्षेत्रात सुरू होणाऱ्या या चळवळीला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने आम्ही रायटर्स क्लबची निर्मिती करीत आहोत.


हा रायटर्स क्लब म्हणजे लेखनाच्या क्षेत्रात अपरिमित संधी घेऊन आलेली एक तरूणांची चळवळ आहे. ज्याला कोणाला लिखाणात स्वारत्स्य आहे, अशा समाजातील कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या चळवळीत सहभागी होता येईल. ही तुमची लेखनाची आवड जोपासतानाच करिअरची सुवर्ण संधी या रायटर्स क्लबच्या निमित्ताने आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

या रायटर्स क्लबचे वेगवेगळ्या स्तरावर उपक्रम राबविले जाणार आहेत. यात प्रामुख्याने

  • लघुकथा लेखन
  • संकल्पनांवर आधारीत माहिती
  • विविध विषयांवरील स्फुट लेखन
  • व्यावसायीक पार्श्वभूमी असलेले लेखन
  • स्पर्धात्मक विषयांवरील लेखन
  • प्रासंगीक लेखन
  • विविध स्पर्धांच्या माध्यमातून निबंध लेखन
  • जनमत चाचणीच्या आधाराने एखाद्या प्रश्नाची उकल

या आणि अशा विविध विषयावरील लेखनात या रायटर्स क्लबमधील सभासदांनी सहभागी व्हावे. असे या रायटर्स क्लबचे नियोजन आहे.

या रायटर्स क्लबच्या माध्यमातून काही स्पर्धा घेतल्या जातील. त्यातून यशस्वी ठरलेल्या लेखनाला सन्मानीत केले जाईल. तसेच त्या लेखनाला त्या संदर्भातील सोशल मीडिया साईटवर प्रकाशित केले जाईल.  तर काही लेखनाची योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे निवड करून त्या लेखकाला आमच्यावतीने करिअर संधी उपलब्ध करून दिली जाईल. 

या रायटर्स क्लबच्या चळवळीत भारतातील कोणत्याही प्रदेशातून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा जाणणाऱ्या व त्याचे योग्य ज्ञान असणारा नागरिक सहभागी होऊ शकतो. त्याकरिता इच्छुक व्यक्तीने किमान माहितीच्या आधारे सभासदत्व घेणे बंधनकारक आहे. 
एखाद्या योग्य विषयावर लिहिलेल्या लिखाणासोबत योग्य ती माहिती भरून इच्छुक व्यक्तीने आपले सभासदत्व घेणे बंधनकारक आहे. शिवाय वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आपण नियमित सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.   
रायटर्स क्लबच्या अशा या कल्पक उपक्रमाला इन्फिनिटी मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रा. लि. चे हितचिंतक, स्नेही, परिचित, उत्तम प्रतिसाद देतील. याचा आम्हाला विश्वास आहे. 

सदस्य व्हा / Be a Member









    Infiniti Writer’s Club

    People across the world use language as a means to communicate their ideas. This language is seen through verbal as well as written expressions. Providing their opinion on different topics through these expressions also helps them develop their writing skills. It is easy for some people to write content that is engaging, entertaining, and thought provoking. We refer to these people as influential writers. 

    We believe that it is essential to create a platform for such writers who love this art they have been gifted with, who want to find a career in this field and whose words have the potential of impacting the masses. We at the Infiniti Management Solutions Pvt. Ltd. constantly encourage such talent and passion and have decided to create a Writers’ Club to provide a launch pad for the next generation of writers in our society.

    This Writers’ Club is a unique opportunity for youth interesting in content writing, feature writing, journalism and every field that stems from the art of writing. The Club welcomes people across ages as long as they possess the passion for writing. Infiniti Management Solutions Pvt. Ltd is creating this independent club as a golden opportunity for those pursuing a career in writing.   

    The activities of this Writers’ Club will be organized at different levels. It will focus mainly of

    • short story writing,
    • concept-based content writing,
    • thematic writing,
    • essay writing
    • research and survey-based writing

    This will enhance & motivate the members writing abilities.

    The Writers’ Club will have a series of quizzes, tests and challenges as well and the best content and its author will be honored. 

    The selected content will also be published on that site’s social media platforms. After receiving this exposure, training and guidance some members of the Writers’ Club will also find long term career opportunities at the Infiniti Management Solutions Pvt. Ltd as well.

    The Writers’ Club welcomes citizens across the country who are fluent in, and/or possess knowledge about, languages including Marathi, Hindi and English.

    For this, it is mandatory for the interested person to subscribe on the basis of this requirement. Interested candidates are requested to fill in the membership form and furnish copies of their writing samples as well. It is also necessary to take part in various activities of the Club taken up from time to time. We at Infiniti Management Solutions Pvt. Ltd believe that this initiative will help mold and empower a new generation of writers, help them dream big and reach for their goals.